सातपूर भागातील सोनाली हॉटेल बेळगाव ढगा येथे एका आयशरमध्ये तब्बल 22 गाई भरून नाशिकच्या ओझर येथे कत्तलीसाठी घेऊन जात असताना जनावर तस्करांना बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पकडले आहे.त्र्यंबकेश्वर येथून नाशिकच्या ओझर येथे कत्तलीसाठी घेऊन जाणार असल्याची माहिती बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्यांना मिळाली होती.तेव्हा तात्काळ सदर ठिकाणी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी नजर ठेवून त्रंबक रोड वरून सातपूरच्या दिशेने येणारी आयशर ट्रक अडवली. त्यात गायी आढळून आल्या.