परभणी हिंगोली मार्गावर औंढा नागनाथ शहरातील बस स्थानक जवळ भरधाव आलेला ट्रक क्रमांक एमएच ३० एव्ही १२६३ हा ट्रक रस्त्याने पायदळ जाणाऱ्या एकाच्या अंगावर जाऊन त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना दिनांक ३ सप्टेंबर बुधवार रोजी रात्री साडेदहा वाजे दरम्यान घडली. अर्जुन नामदेव काळे वय २१ वर्षे राहणार पिंपळदरी तालुका औंढा नागनाथ असे जागीच मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक जीएस राहीरे,पोलीस उपनिरीक्षक शेख खुदुस, जमादार वसीम पठाण, इक्बाल शेख यांनी तात्काळ घटनास्थळी घेतली.