आडगाव या गावात शिमला गुड्डू पावरा वय २७ ही विवाहिता पती सह आपल्या घरी होती. दरम्यान तिला अस्वस्थ वाटू लागले आणि चक्कर आले व ती जमिनीवर कोसळून बेशुद्ध झाली. तिला तातडीने पतीने ग्रामीण रुग्णालय मेहुणबारे येथे आणले. रुग्णालय आता डॉक्टरांनी तपासणी करून तिला मयत घोषित केले. तेव्हा याप्रकरणी मेहुणबारे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूचे नोंद करण्यात आली आहे.