धनेगाव ब्रिज ते बोंढार बायपास टापरे चौकचे अलीकडे नांदेड येथे यातील फिर्यादी मोहंमद नुरोद्दीन मोहमद बहिबोद्दीन यांचा टाटा कंपनीचा पांढऱ्या रंगाचा हायवा टिप्पर क्रमांक एमएच ३४ बीजी ७८६५ किंमत ३ लाख ५0 हजाराचा उपरोक्त ठिकाणावरून कोणतीरी अज्ञात चोरट्याने चोरून नेला. सदरील हि घटना दि ४ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री ११ ते दि ५ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ७ च्या दरम्यान घडली याप्रकरणी आज सायंकाळी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला असून पुढील तपास सुरू आहे.