श्रीनगर पोलिसांनी फेक फेसबुक अकाउंट प्रकरणी एका राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या एका कार्यकर्त्याला ताब्यात घेतले आहे. मात्र पोलीस हे सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली येऊन कारवाई करून निष्पापांना ताब्यात घेऊन त्यांना त्रास देत असल्याचा आरोप राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी नगरसेवक अमित सरय्या यांनी केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी नि:पक्षपतीपणे तपास करून योग्य ती कारवाई करावी अशी प्रतिक्रिया देखील दिली आहे