शहरातील एका महिलेसह तिघांची शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास भाग पाडून फसवणूक केल्याची घटना घडली आहे.गुंतवणुकीवर अधिकच्या नफ्याचे आमिष दाखवून भामट्यांनी तब्बल 1 कोटी 15 लाख 33 हजार 529 रूपयांना गंडविले आहे. गुंतवणूकीची रक्कम व मोबदला पदरात न पडल्याने गुंतवणुकदाराने पोलीसात धाव घेतली आहे. सायबर पोलीस ठाण्यात फसवणुकीसह आयटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.