आज दिनांक 28 ऑगस्ट रोजी सायंकाळी सहाच्या दरम्यान नायगाव तालुक्यातील कोलंबी येथील हळदा रोड वर 18 विद्यार्थी एक शिक्षक आणि ड्रायव्हरला पुराच्या पाण्यातुन बाहेर काढण्यात आले. शालेय विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बस पुराच्या पाण्यात अडकली होती. या ठिकाणी प्रशासनाचे अधिकारी आणि स्थानिक नागरिकांनी मानवी साखळी करून या सर्व विध्यार्थाना सुरक्षित बाहेर काढले