परभणी जिल्हा शासकीय रुग्णालयांमध्ये आकारण्यात येणारी फी तातडीने मागे घेऊन गोरगरीब रुग्णांवर मोफत व दर्जेदार औषध उपचार उपलब्ध करून द्यावेत, या मागणीसाठी ऑल इंडिया युथ फेडरेशनच्या वतीने आज मंगळवार 2 सप्टेंबर रोजी दुपारी 12 30 वाजता परभणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय समोर तीव्र आंदोलन करण्यात आले.