गणपती विसर्जनासाठी गावाकडे आलेल्या एका 31 वर्षीय तरुणाचा पाझर तलावात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना पठाराचा वाडा येथे घडली.आनंद काळू झोरे (वय 31, रा. येळवण जुगाई, पठाराचा वाडा) असे मृत युवकाचे नाव आहे.ही घटना मंगळवार दिनांक 2 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास घडली. आनंद झोरे हा मुंबई येथे नोकरीस होता.सध्या गणपती सणानिमित्त आपल्या मूळगावी आला होते. विसर्जनाच्या निमित्ताने पाझर तलावाजवळ गेले असताना अचानक पाण्यात बुडाले.ग्रामस्थानी तात्काळ शोध मोहिम सुरू केली.