पाटाळा येथील अल्पवयीन मुलगी दु. ३ वाजताच्या सुमारास आजोबांच्या घरून कोणालाही न सांगता निघून गेली होती. नातेवाईकांनी मुलीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र ती मिळून आली नसल्याने तिला कोणीतरी फुस लावून पळवून नेले असावे, असा संशय व्यक्त करत मुलीच्या मामाने पोलीस ठाण्यात तोंडी रिपोर्ट दिला. त्यावरून माजरी पोलीस ठाण्यात कलम १३७(२) बीएनएस अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला. तपास करताना माजरी पोलीस पथकाने काल दि २२ आगस्ट ला सायंकाळी ७ वाजता तात्काळ कारवाई करत मुलीला हिंगणघाट तब्येत घेतले.