मुक्तिधाम परिसरातील अपघातानंतर शिवसेना पदाधिकाऱ्यांनी पाहणी दौरा केला.वाहतूक कोंडी, अतिक्रमणावर उपाययोजनांसाठी विभागीय अधिकार्यांना भेटून अहवाल तयार करणार आहे.मुक्तिधाम परिसरात नुकत्याच झालेल्या एका भीषण अपघातात गरोदर महिलेसह दोन महिलांचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी या परिसराचा पाहणी दौरा करून रस्त्यांसंदर्भातील अडचणी,वाहतूक कोंडी,पार्किंग समस्या, अतिक्रमण आणि कुंभमेळ्याच्या दृष्टीने उद्भवणाऱ्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.