आज रविवार दि. ३१ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजताच्या दरम्यान महसूल विभागाच्या पथकाने चिरकुटा जवळ रेतीची चोरटी वाहतूक करणारा ट्रॅक्टर जप्त केला. दिग्रस तहसिल कार्यालयातील मंडळ अधिकारी, तलाठी चिरकुटा व तुपटाकळी परिसरात अतिवृष्टीमुळे बाधित शेतीचे पंचनामे करत असताना पथकांना ट्रॅक्टर क्र. एमएच-२९ बीसी ३९५६ व ट्रॉली क्र. एमएच-२९ बीपी ३३३२ हा विनापरवाना एक ते सव्वा ब्रास रेती नदी नाल्यातून वाहतूक करताना आढळला. पथकाने वाहन थांबविण्याचा प्रयत्न केला असता रेती तस्कराने वाद निर्माण केला होता.