एरंडोल तालुक्यात जवखेडा बुद्रुक हे गाव आहे या गावाच्या शेत शिवारात संजय पाटील यांच्या शेतात सुनील भारत पवार वय ३० या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर त्याला ग्रामीण रुग्णालय एरंडोल येथे नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मयत घोषित केले.तेव्हा याप्रकरणी एरंडोल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.