हूपरी-तळंदगे रस्त्यावर रविवार दिनांक 24 ऑगस्ट रोजी रात्री साडे अकराच्या सुमारास तळंदगे फाटा येथील आरोह हॉटेलसमोर दुचाकी आणि चारचाकी वाहनाचा भीषण अपघात झाला.या अपघातात दुचाकीस्वारांना सुमारे 40 ते 50 फूट फरफटत नेल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे.अपघात इतका गंभीर होता की दोन्ही दुचाकीस्वार मोठ्या प्रमाणावर जखमी झाले.