मैत्रिणीची छेड काढल्याच्या संशयावरून रागाच्या भरात एका विधी संघर्षित बालकाने एका भिकाऱ्याच्या डोक्याला दगडाने मारहाण करून हत्या केल्याची खळबळजनक घटना ठक्कर बाजार जवळ घडली आहे.पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार एक विधीसंघर्षित बालक आपल्या मैत्रिणी सोबत ठक्कर बजार जवळील एका हॉटेल जवळ मैत्रिणी बरोबर उभा होता.त्याचवेळी मैत्रीण पाण्याची बाटली आणण्यासाठी गेली असता तिथे एक भिकारी बसलेला होता.त्याने या मुलीची छेड काढण्याचा संशय त्या विधीसंघर्षित आल्याने त्याने त्याला दगडाने मारहाण केली.