माणगाव तालुक्यातील येरद गावात जबरी चोरी करण्यासाठी घरात घुसून वृद्ध महिलेचा खून करणाऱ्या आरोपीला माणगाव पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे.दि. १० मे २०२५ रोजी रात्री १०.३० च्या सुमारास येरद गावातील सौ. संगिता मनोहर मोकाशी (वय ७०) यांच्या घरी अज्ञात व्यक्तीने जबरी चोरीसाठी प्रवेश केला. चोरीदरम्यान आरोपीने महिलेच्या गळ्यातील व हातातील सोन्याचे दागिने, कानातील दागिने तसेच दोन मोबाईल फोन असा मुद्देमाल लंपास केला. या दरम्यान महिलेने विरोध करताच आरोपीने तिच्यावर जोरदार मारहाण करून हत्या केली.