मागील महिनाभरापासून नालवाडी ग्रामपंचायत हद्दीतील कचरा संकलन बंद असून त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता व दुर्गंधी पसरली आहे. याबाबत स्थानिक नागरिकांनी ग्राम विस्तार अधिकारी रामेश्वर चव्हाण व प्रशासक राठोड यांना निवेदन सादर करत तातडीने कचरा गाड्या सुरू करण्याची आणि फॉगिंग (धुरळणी) करण्याची मागणी दिनांक 10 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजताच्या सुमारास केली आहे.