गुटखा वाहतूक करणारा आयशार टेम्पो पकडून 43,43,800रू किंमतीचा गुटखा व 21लाख रुपये किंमतीचा टेम्पो 1 फेब्रुवारी रोजी रात्री वेळापुर येथील पालखी चौकात वेळापुर पोलीसांनी पकडला. सापडलेल्या गुटखा वाहना विषयी अन्नसुरक्षा विभागास कळवल्यानंतर नंतर अन्नसुरक्षा विभागाचे अन्न सुरक्षा विभागाचे अधिकारी मंगेश लवटे यांनी वाहन व त्यातील गुटखा जप्त करून वाहनांचे मालक व जप्त केलेल्या मालाचे मालक यांच्यावरही वेळापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे.