खारघर सेक्टर क्रमांक तीन मधील एका इमारतीमध्ये एक भला मोठा अजगर आढळून आला. इमारतीमध्ये ठेवलेल्या बुटाच्या रॅक मध्ये आढळल्यानंतर एकच खळबळ उडाली. याची माहिती सर्पमित्रांना दिल्यानंतर सर्पमित्र घटनास्थळी दाखल झाले आणि अजगराला सुखरूप रेस्क्यू करून अग्निशमनदाराच्या ताब्यात दिले. त्यानंतर रहिवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. मात्र इमारतीचा अचानक भला मोठा अजगर आढळल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.