शहरातील हिवरखेड रोड मार्गावरील रेल्वे क्रॉसिंग जवळील वॉटर सप्लाय प्लांट जवळ शनिवारी ४० वर्षे वयाच्या व्यक्तीचे शव आढळले. ही माहिती शहर पोलिसांना मिळताच शहर पोलिसांनी या ठिकाणी पोहोचून ओळख पटवण्याचे आवाहन केले असता सदर मृतक व्यक्ती ही नाशिक येथील दीपक ठाकरे असल्याचे प्राथमिक माहीती आहे.व ते उमरा येथे नातेवाईकांकडे आले होते अशी प्राथमिक माहिती प्राप्त होत आहे. याप्रकरणी शहर पोलीसात मर्ग दाखल करण्यात आला आहे पुढील तपास शहर पोलीस करीत आहेत.