शिरूर कासार तालुक्यातील धोरकरवाडी गावात आज ओबीसी (इतर मागासवर्गीय) समाजाच्या शेकडो नागरिकांनी एकत्र येत आरक्षणात होणाऱ्या कथित घुसखोरीविरोधात तीव्र स्वरूपाचा निषेध नोंदवला. गावातील मुख्य रस्त्यावरून शांततेत, पण आक्रमक पद्धतीने भव्य रॅली काढण्यात आली, ज्यामध्ये शासनाच्या धोरणांबाबत नाराजी व्यक्त करत मराठा समाजाकडून ओबीसी आरक्षणात केलेल्या हस्तक्षेपाचा जोरदार विरोध करण्यात आला. या रॅलीमध्ये सहभागी झालेल्या ओबीसी बांधवांनी तीव्र घोषणा देऊन निषेध केला.