श्री गणेश उत्सवाच्या आनंदात कागल शहराला आलेल्या चिरंतन आनंदात दुःखाचे सावट ओढले आहे. शनिवार दिनांक 30 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजता कागल शहरात गणेशोत्सवाच्या निमित्ताने गस्त घालत असलेल्या होमगार्ड जवान अविनाश चंद्रकांत पाटील (वय 38, राहणार शाहूनगर बेघर वसाहत, कागल) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.ही घटना शनिवार दिनांक 30 ऑगस्ट रोजी रात्री 9 वाजता कागल पोलीस ठाण्यात नोंद झाली असल्याची माहिती आज रविवार दिनांक 31 ऑगस्ट रोजी सकाळी आठ वाजता कागल पोलिसातून मिळाली.