कोल्हापूर शहरातील सिद्धार्थ नगरात दोन गट आपापसात भिडले आहेत. फलक आणि साऊंड सिस्टिम लावण्यावरून झालेल्या वादामुळे दोन गटात प्रचंड दगडफेक करण्यात आली. या दगडफेकी नंतर वाहनही पेटवून देण्यात आली. रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडलेल्या घटनेने प्रचंड तणाव निर्माण झाला होता.दरम्यान घटनास्थळी पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या नेतृत्वाखाली अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.या घटनेमध्ये दोन पोलीस जखमी झाल्याची प्राथमिक माहिती घटनास्थळावरून मिळाली आहे.