जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे 112 या क्रमांकावर पोलिसांना खोटी माहिती देणे तरुणाच्या चांगलेच अंगलट आले असून खोटी माहिती देऊन पोलिसांची दिशाभूल केल्याप्रकरणी किरण पाटील या तरुणा विरोधात पाचोरा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किरण पाटील या तरुणाने 112 क्रमांकावर फोन करत जळगावमध्ये बॉम्ब फुटणार असल्याची खोटी माहिती दिली. यानंतर पोलिसांनी आपला विविध यंत्रणेद्वारे या प्रकरणी सखोल चौकशी केली असता सदर तरुणाने पोलिसांना खोटी माहिती देऊन दिशाभूल केल्याचे निष्पन्न झाले,