थेट पाईपलाईन योजनेत तांत्रिक बिघाड झाल्यामुळे ऐन सणासुदीच्या काळात कोल्हापूरला पाणीपुरवठा न होणे हे दुर्दैवी आहे अशी खंत वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केलीय. ते आज दिनांक 28 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी दोन वाजता जिल्हा मध्यवर्ती बँकेत पत्रकार परिषदेत बोलत होते. दरम्यान कोल्हापूरकरांना पाणी देणार नसू तर लोकांची नाराजी उफाळून येईल असं सांगत थेट पाईपलाईन मध्ये जी अडचण येत असेल तर तातडीने सोडवलं पाहिजे असे देखील मुश्रीफ यांनी म्हटल आहे.