मोहाडी तालुक्यातील रामपूर येथे दि. 21 ऑगस्ट रोज गुरुवारला दुपारी 2 वाजता च्या सुमारास मोहाडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राहुल चौधरी हे आपल्या पोलीस पथकासह पेट्रोलिंगवर असताना त्यांना एका विना क्रमांकाच्या ट्रॅक्टरमध्ये विनापरवाना एक ब्रास रेतीची चोरटी वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आले. यावेळी पोलिसांनी सदर ट्रॅक्टर व एक ब्रास रेती असा एकूण 6 लाख 6 हजार रुपयांच्या मुद्देमाल जप्त केला असून आरोपी ट्रॅक्टर चालक अंकित शेंडे याच्याविरुद्ध मोहाडी पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.