फलटण शहरातील आगामी गणेश विसर्जन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस दल सक्रिय झाले आहे. गणेश विसर्जन मिरवणुकीतील वाद टाळण्यासाठी पारंपरिक मार्गात बदल करण्याची मागणी नागरिकांकडून होत असतानाच, दुसरीकडे डीजे लावल्यास थेट गुन्हे दाखल करण्याचा सक्त इशारा वरिष्ठ शहर पोलीस निरीक्षक पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांनी दिला आहे. शहा यांच्या अध्यक्षतेखाली पोलीस ठाण्यामध्ये शनिवारी सकाळी साडेअकरा वाजता शहरातील गणेश उत्सव मंडळांची बैठक झाली.