यावल शहरात सातोद रोडावर भारतीय स्टेट बँकेची शाखा आहे. या शाखेत बचत गटाचे पैसे काढण्यासाठी सुशीला तेली वय ६८ रा. कोळवद ही महिला आली होती. त्यांनी बँकेतून ६० हजार रुपये काढले आणि एका कापडी पिशवी ठेवले. व त्या बँकेच्या बाहेर निघाल्या असता कुणीतरी अज्ञात चोट्यांनी पिशवी कापून त्याच्यातून पैसे चोरी केले. तेव्हा याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.