जिल्ह्यात रात्री 3 पासून पडत असलेल्या पाऊसामुळे काही ठिकाणी अतिवृष्टी निर्माण झाली आहे. नांदेड शहरासह काही तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. जिल्ह्यातील प्रकल्प,नदी-नाले तुडूंब भरल्याने काही गावात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाची सर्व यंत्रणा सज्ज असून धोकादायक परिस्थितीच्या ठिकाणी सर्व टिम लक्ष ठेवून नियंत्रण करत आहे. यासाठी नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी कर्डीले यांनी आजरोजी दुपारी 2:30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय केले आहेत