राज्यासह देशभरात गणेश उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. आज दिनांक 27 ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थी निमित्त वडकी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या ग्रामीण भागात 17 सार्वजनिक गणेश मंडळाची स्थापना करण्यात आली असल्याची माहिती वडकी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुखदेव बोरखडे यांनी दिली आहे.