नवी मुंबईच्या कोपरखैरणे येथील एका पोलिस अधिकाऱ्यांनी बेजबाबदारपणाचे कृत्य केले आहे. आपल्या स्वतःच्या अवघ्या काही महिन्याच्या मुलीच्या हातामध्ये कारचे स्टेरिंग देऊन रील बनवले आहे. अवघ्या काही महिन्याच्या चिमुकलीच्या हातामध्ये स्टेरिंग देऊन पोलीस अधिकाऱ्यांनी स्वतःसह चिमुकली आणि इतरांचा जीव धोक्यात घातला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून या पोलीस अधिकाऱ्यावर काय कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.