नायगाव तालुक्यातील नरसी येथे दि २८ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी सातच्या सुमारास यातील आरोपी १) मथुराबाई गिरी २) काशिनाथ गिरी ३) संतोष गिरी यांनी संगणमत करून यातील फिर्यादीचे मुलास दुधाचे पैसे देण्याच्या कारणावरून लोखंडी रॉडने मारहाण करून गंभीर दुखापत केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी फिर्यादी गोविंद तुप्पेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आज दुपारी रामतिर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला असुन पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नरवाडे हे आज करीत आहेत.