गणेशोत्सवानंतर दुसऱ्या महत्त्वाच्या सणाचा म्हणजे गौराई आगमनाचा उत्सव आज रविवार दिनांक 31 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजेपासून ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत इचलकरंजी शहरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.आज गौराईच्या आगमनानिमित्त शहरातील बाजारपेठा फुलून गेल्या होत्या.फुलांच्या तोरणांपासून ते पूजेच्या साहित्यापर्यंत सर्व वस्तूंमध्ये मोठी खरेदी झाली. महिलांनी साड्या,पारंपरिक अलंकार,सौंदर्यप्रसाधने यांची खरेदी करत बाजारपेठ गजबजून टाकली.गांधी चौक,गणेशनगर,शहापूर,जनता बँक चौक माहिलांची गर्दी होती.