परभणी येथून चाकरमान्यांना घेऊन हिंगोली कडे जाणाऱ्या क्रुझर जीप क्रमांक एमएच २२ यु ०७२५ या जीपवर औंढा नागनाथ तालुक्यातील सुरेगाव पाटी जवळ पाठीमागून आलेली भरधाव कार क्रमांक एमएच १२ क्युटी ८७१८ ही कार क्रुझर जीप वर आदळली यानंतर क्रुझर जीप अनियंत्रित होऊन रस्त्याच्या बाजूला असलेल्या नालीत गेली यामध्ये प्रवासी गजानन भाले यांना गंभीर दुखापत होऊन क्रुझर जीपचे व कारचे नुकसान झाल्याची घटना दिनांक ११ सप्टेंबर गुरुवार रोजी सकाळी दहा वाजे दरम्यान घडली होती.