कराड शहरासाठी एक महत्त्वाचा निर्णय झाला असून कराड मुख्य टपाल कार्यालयाच्या इमारतीच्या दुरुस्ती व नुतनीकरणासाठी ५० लाख रुपयांचा निधी केंद्र सरकारकडून मंजूर करण्यात आला आहे, अशी माहिती खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी मंगळवारी दुपारी एक वाजता दिली. यासंदर्भात दि. 20 डिसेंबर 2024 रोजी केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांची भेट घेऊन खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी निवेदन सादर करत लक्ष वेधले होते. कराड येथील टपाल कार्यालयासाठी विशेष निधी आग्रही मागणी केली