सातारा शहरातील सदरबझार परिसरात भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या जागेची पाहणी महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे सदस्य गोरक्ष लोखंडे यांनी शुक्रवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास केली. सातारा जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांमध्ये घडलेल्या घटनांच्या अनुषंगाने शासकीय विश्रामगृहात प्रशासकीय आणि पोलीस अधिकाऱ्यांकडून लोखंडे यांनी विविध विषयांचा आढावा घेतला.