कोरेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे रिक्त झालेल्या एका संचालकाच्या जागेसाठी बुधवारी दुपारी दीड वाजता निवडणूक झाली. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळस्कर हे १३ विरुद्ध चार मतांनी विजयी झाले तर ओंकार चव्हाण हे उमेदवार पराभूत झाले. सोळस्कर यांनी यापूर्वी बाजार समितीत ३७ वर्ष संचालक म्हणून काम पाहिले आहे आणि तेरा वर्ष सभापतीपदावर ते कार्यरत होते. बाजार समितीचे माजी उपसभापती आणि संचालक दिलीप अहिरेकर यांनी राजीनामा दिल्याने संचालक पद रिक्त झाले होते.