गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गावात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी,तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी हातकणंगले पोलीस दलाच्या वतीने कुंभोज येथे आज शनिवार दिनांक 23 ऑगस्ट रोजी दुपारी दीड वाजता गावातून रूट मार्च काढण्यात आला.या रूट मार्चमध्ये स्थानिक पोलीस ठाण्यांचे अधिकारी, कर्मचारी, होमगार्ड तसेच एसआरपी (सशस्त्र पोलीस पथक) यांचा मोठ्या संख्येने सहभाग होता. रूट मार्चची सुरुवात ग्रामपंचायत कार्यालयापासून झाली.