राज्य शासनाने हैदराबाद गॅझेटीयर नुसार मराठा समाजाला कुणबी मराठा म्हणून आरक्षण घोषित केले परंतु पूर्वीपासूनच हैदराबाद गॅझेटीयर मध्ये बंजारा समाजाचा उल्लेख हा एस.टी.प्रवर्गात असल्याने हैदराबाद गॅझेटीयर नुसार बंजारा समाजाला ही एसटी प्रवर्गाचे आरक्षण देण्यात यावे अशी मागणी औंढा नागनाथ तालुक्यातील सकल बंजारा समाज बांधवांच्या वतीने दिनांक ९ सप्टेंबर मंगळवार रोजी दुपारी एक वाजता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना औंढा नागनाथ नायब तहसीलदार प्रवीण ऋषी यांच्यामार्फत निवेदन दित केली आहे.