कोळवद या गावातील सुशीला दामू केली वय ६८ या महिला यावल शहरातील भारतीय स्टेट बँकेच्या शाखेत आल्या होत्या. इथून त्यांनी बचत गटाचे ६० हजार रुपये काढले आणि एका कापडी पिशवीत ठेवले. त्या पिशवीला कोणीतरी अज्ञाताने कापून त्यातून पैसे लांबवले. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचे काही सीसीटीव्ही फुटेज आता समोर आले आहे व पोलीस या सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसत असलेल्या महिलेचा शोध घेत आहे.