खा.सुनील तटकरे व महीला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांच्या माध्यमातून ३४ कोटी ४० लाख निधी खर्चुन रोहा शहरात ७२८ आसन व्यवस्था, अत्याधुनिक साउंड सिस्टीम, सुसज्ज अत्याधुनिक सी.डी.देशमुख शहर सभागृहाचे उद्घाटन १२ सप्टेंबर रोजी होणार आहे अशी माहिती माजी आ.अनिकेत तटकरे यांनी दिली. सी.डी.देशमुख नाट्यगृहाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार, खा.सुनील तटकरे, ना.आदिती तटकरे, प्रसिद्ध कलाकार सयाजी शिंदे सह दिग्गज कलाकार उपस्थित राहाणारे आहेत.