मोहाडी शहरातील शिवाजी चौक येथे दि. 2 सप्टेंबर रोज मंगळवारला दुपारी 12 वा.च्या सुमारास फिर्यादी रेहान असलम शेख हा मोबाईल सिम पोर्ट करण्याकरिता सिराज मोबाईल दुकानात बसला असता आरोपी नईम मोहम्मद कुरेशी हा मोबाईल दुकानदाराला शिवीगाळ करीत होता यावेळी फिर्यादीने तुम्ही सिराजला शिवीगाळ कशाला करता असे हटकले असता आरोपीने फिर्यादीच्या कपाळावर पेंचीसने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. यावेळी फिर्यादीच्या तक्रारीवरून व प्राप्त वैद्यकीय अहवालावरून घटनेची नोंद मोहाडी पोलिसात करण्यात आली आहे.