दर्यापूर-अंजनगाव सुर्जी मतदारसंघातील सर्व गणेश मंडळे आणि नागरिकांना नियम पाळूनच सण उत्सव साजरे करण्याचे आमदार गजानन लवटे यांनी आज सकाळी ११:३० वाजता कळकळीचे आवाहन केले आहे. उत्सव आपला आहे आणि त्याला गालबोट लागू नये म्हणून त्यांनी शांततेच्या मार्गाने आणि नियमांचे पालन करुन उत्सव साजरा करा असे आवाहन केले तसेच सर्व गणेश भक्तांना विसर्जनाच्या शुभेच्छा दिल्या.