म्हैसाळ - कनवाड बंधाऱ्याचे काम करताना ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे बनवाडी रस्त्यालगत असलेल्या मळी परिसरातील गट नंबर 191 ते 200 मधील सुमारे साडेनऊ एकर जमीन नदीपात्रात वाहून गेली आहे.ही घटना ठेकेदाराने पावसाळ्यापूर्वी नदीमध्ये उभारलेला बांध वेळेत न काढल्यामुळे घडली असून, परिणामी कनवाड हद्दीतील जमीन पूर्णतः नष्ट झाली आहे.या घटनेनंतर महसूल,कृषी आणि पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त पंचनामा केला असून,पंचनाम्यात जमीन वाहून गेल्याची स्पष्ट नोंद आहे.