शिरोळ येथील सोंडमळी परिसरात महापूर ओसरल्यानंतर शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.या पार्श्वभूमीवर आज कृषी विभाग व महसूल प्रशासनातर्फे पंचनाम्याचे काम सुरू करण्यात आले.मात्र,पंचनाम्याच्या प्रक्रियेत मंडलाधिकारी,तलाठी व कृषी अधिकारी दुजाभाव करत असल्याचा गंभीर आरोप शेतकरी महेश जाधव यांनी आज बुधवार,दिनांक 10 सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता केला आहे.सध्या काही भागांतील ऊस हिरवागार दिसत असला तरीही त्याचे मूळ नुकसान पाण्यात भिजल्यामुळे झाले आहे.