नागपूर मुंबई राष्ट्रीय महामार्ग क्रं.५३ वरून नागपूर कडून गुजरात कडे कोळसा घेवून जाणारा ट्रक क्रं.जी.जे.०२ एक्स एक्स ०६१६ हा ट्रक अकोला कडून खामगावच्या दिशेने जातांना गुरुवार दि.३१ जुलै रोजी सायं.शेळद फाट्यावर ड्रायव्हरचे ट्रक वरील अचानक नियंत्रण सुटल्याने ट्रक रस्त्याच्या खाली गेला व अपघात झाला.सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवित हानी झाली नसून मोठी घटना टळली.मात्र रस्त्याच्या कडेला लावलेले डिवायडर तुटून ट्रकचे समोरील टायर निखळल्यामुळे ट्रकचे भरपूर नुकसान झाले.