उल्हासनगरच्या साईनाथ कॉलनी येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. रात्री उशिराच्या सुमारास साईनाथ कॉलनी येथील शौचालय परिसरामध्ये गोळीबार झाला. झालेल्या गोळीबारामध्ये दोन जण जखमी झाले आहेत. माहिती मिळत असेल लाईन पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. गोळीबार हा कौटुंबिक वादातून झाला असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याची माहिती परिमंडळ चार चे पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी दिली.