मुर्तीजापूर तालुक्यातील गोरेगाव (प. म) शिवारात कामाला गेलेल्या सुर्वणा गजानन डोईफोडे (28) यांच्यावर आज अचानक रानडुकराने हल्ला केला. हा हल्ला इतका भीषण होता की त्या गंभीर जखमी झाल्या. सोबतच्या महिलांनी जीव धोक्यात घालून रानडुकराला पळवून लावले. त्यांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले असून, सुदैवाने त्यांचा जीव वाचला आहे. या वाढत्या दहशतीवर वनविभागाने तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी शेतकरी व मजुरांतून होत आहे.