महसूल विभागाच्या वतीने दिनांक 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2025 च्या कालावधीत सेवा पंधरवाडा साजरा करण्यात येणार आहे या पार्श्वभूमीवर रिसोड तालुक्यातील महसूल प्रशासनाने तयारी सुरू केली आहे.तहसील कार्यालय रिसोड येथे तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांची बैठक घेण्यात आली अशी माहिती तहसील प्रशासनाने दिनांक 13 सप्टेंबर रोजी संध्याकाळी साडेसहा वाजता दिली आहे