घोडबंदर रोडवरील गायमुख घाट येथे दोन कंटेनर ची धडक बसल्याने कंटेनर पलटी होऊन भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये कर्तव्यावर असलेले एक पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. दोन्ही कंटेनर पलटी झाल्याने घोडबंदर रोडवरील दोन्ही लेनवर दोन तासांपासून वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली. क्रेन,आपत्ती व्यवस्थापन कक्ष,हायड्रा मशीन घटनास्थळी दाखल झाले असून दोन्ही कंटेनर रस्त्याच्या बाजूला केले आहेत आणि वाहतूक कोंडी सोडवण्याचा प्रयत्न सुरू आहे.